बळी

बिघडत चाललेली मानसिकता आणि त्यातुन जन्माला येणार नैराश्य. एक दिवस हेच आपल्या विनाशाच कारण ठरणार आहे.

Originally published in mr
Reactions 4
509
Neha Dhole
Neha Dhole 21 Jun, 2020 | 1 min read

सुशांतला जाऊन आज आठ दिवस झाले . आता हा सुशांत कोण तुमच्या आता लक्षात आहे पण जे कुणी अजुन साधारण महिन्याभराने हा लेख वाचतील त्यांच्यासाठी सांगते, इथे सुशांत म्हणजे मी सुशांत सिंग राजपूत बद्दल बोलतेय. हळूहळू त्याच्याबद्दलची कोरडी सांत्वना कमी होत जाईल. स्टेटस तर बंद पण झाले एव्हाना. जी टाईमलाईन काही दिवसांपासून त्याच्या पोस्टने भरलेली होती ती  आता पूर्ववत होत चाललेली आहे. पण सुशांतच्या जाण्याने एका नव्या विषयाला तोंड फुटले Nepotism शुद्ध मराठी भाषेत वशिलेबाजी किंवा नातलागत्व. मग आता आम्ही सगळे अमुक तमुक लोकांवर तोंडसुख घेत आहोत. ते चुक बरोबर हे ठरवाण्याचा मला अधिकार नाही. सुशांतच्या बाबतीत जे झालं ते खरोखर वाईट आहे. त्याच्यावर अन्याय होत आहे हे दाखवुन देण्यासाठी त्याला खुप टोकाचं पाऊल उचलावं लागलं. आपण त्यासाठी ज्या लोकांना दोष देतोय ते कदाचित योग्यही असेल . पण म्हणुन सगळे प्रश्न सुटणार आहेत का...? जर ह्या घटना आपल्याला थांबवाव्या वाटत असतील तर मुळावर घाव घालणं आवश्यक आहे. हा प्रश्न आजचा नाही किंवा फक्त बॉलिवूडचा नाही प्रत्येक ठिकाणी ह्या घटना घडतात आणि असे कितीतरी सुशांत मारले जातात. पण ह्या गोष्टीकडे कधीही गंभीर्याने पहिलेच जात नाही. साधं शाळेचं उदाहरण घ्या कितीतरी वेळेस एखादा फक्त मोठयाघरचा मुलगा आहे किंवा कुणातरी शिक्षकाचा आहे किंवा संस्थेतील कुणाचा तरी आहे तेव्हा त्याचाच उदोउदो केला जातो आणि तुम्ही हे नाकारू शकत नाही. तेव्हा कुठेतरी एक सुशांत जन्माला येतो, जेव्हा नोकरीसाठी तुम्ही गेलेले असता तेव्हा कितीतरी कंपन्यांमध्ये रेफरन्स वाल्यांना प्रेफरन्स दिल्या जातो मग ते काय आहे..?हे फक्त उदाहरण आहे. असं प्रत्येक क्षेत्रात होत. आपल्या आजूबाजूलाच घडत असत हे सगळं पण आपण डोळ्यांवरची पट्टी काढून बघत नाही. तुमच्यात टॅलेंट आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला खुप परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी खुप अपमान सहन करावे लागतात. आणि मग कुठे तुम्ही मोठे होता. पण ही जी फेज असते ,ती पार करता यायला हवी आणि सगळ्यांनाच ते जमेल असही नाही. आणि जोपर्यंत असे लोक ह्या सिस्टीम मध्ये आहेत तो पर्यंत सगळ्याच क्षेत्रांमध्ये असे अनेक सुशांत जन्माला येतील. ही प्रवृत्तीच मुळात नष्ट व्हायला हवी नाहीतर असे अनेक सुशांत आपल्यामधून नष्ट होत जातील.

©Neha R Dhole.

4 likes

Published By

Neha Dhole

nehadhole

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

  • Surekha Kulkarni · 3 years ago last edited 3 years ago

    Very good👍 and always fan of your thoughts.

  • ajinkya kulkarni · 3 years ago last edited 3 years ago

    As usual great great great 🔥

  • Ashvini Pangarkar · 3 years ago last edited 3 years ago

    Superb👏👏👏👏👏

  • Manali naladkar · 3 years ago last edited 3 years ago

    Very true.. we need change.. very well written.. 👌👌👍🏻👍🏻👏👏

Please Login or Create a free account to comment.