मनातल्या गावात शब्दांच शेत!

Agriculture of words

Originally published in mr
Reactions 0
440
Deepali sanotia
Deepali sanotia 26 Aug, 2021 | 1 min read

मनातल्या गावात एक अव्यक्त भावनांच शेत होतं

शेतकरी जमिनीवर बसला होता

स्वताःच्या विचारातच गुंतला होता

बाहेर फार वारं सुटल होतं

विचारान्च्या लाटात मनाचं रुदन फुटलं होतं

जवळपास कोणीही नव्हतं

मनाचं सर्व मनातच भरलं होतं

मध्यांतरि वर ढगांतून एक पावसाची थेंब

कोरड्या मनावर पडली होती

शेतकरीच्या मनात भावनांच्या लाटांची रेल धावली होती

त्या भावनांना शब्दांचे अंकुरण फुटले होते

नव विचारांनी शेतकरी च्या मनाचे शेत भिजले होते

शेतकरी ने शब्दांचे अंकुरण आख्या शेतात पसरून दिले होते

अता त्या अंकुरणांचे लहान-लहान रोपं आले होते

त्याच्या मनातील माउली त्या रोपांना पहात होती

थोड्या थोड्या वेळात त्या रोपांना खाद-पाणी देत होती

ते खाद-पाणी होतं विश्वासाच, अभिव्यक्तिच,

स्वातंत्र्याच आणि सततपणेच

अता शेतकरी ने शब्दांची शेती केली होती

सुंदर-सुंदर लेखनाची रेल-पेल केली होती

शब्दांच्या शेताची पीक सर्वदूर लहलहत होती

अता मनातल्या गावाची जमिनीवर शब्दांच शेत आल होतं

शेतकरीच शेत मनातल्या गावातून निसटल होतं

आणि सर्व्या जगात पसरलं होतं

मनातल्या गावात शब्दांच शेत लहलहत होतं



0 likes

Published By

Deepali sanotia

deepalisanotia

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

Please Login or Create a free account to comment.